ED Raid : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेस नेते हरकसिंग रावत यांच्या घरावर ईडीचा छापा ; उत्तराखंडपासून दिल्लीपर्यंत 12 ठिकाणी ईडीची कारवाई

ED Raid : देशातील भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये ईडी वेगाने कारवाई करत असल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ईडीने अनेक नेत्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जमा केली आहेत. आज सकाळपासून पुन्हा एकदा धाडसत्र सुरु केले आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तराखंडमधील काँग्रेस सरकारमधील मंत्री हरकसिंग रावत यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली आहे. वन घोटाळ्याशी संबंधित महत्त्वाच्या आरोपांवरून ईडीने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच संबधी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
#WATCH | Enforcement Directorate conducts raids at residences related to former Uttarakhand minister Harak Singh Rawat in Dehradun. pic.twitter.com/TU7Qp60ZZM
— ANI (@ANI) February 7, 2024
उत्तराखंडमधील काँग्रेस नेते हरकसिंग रावत आणि इतरांच्या घरांवर अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत.दरम्यान, उत्तराखंड आणि दिल्ली-एनसीआरमधील डझनहून अधिक ठिकाणी मनी लाँड्रिंग प्रकरणावरून ईडीने ही कारवाई केली असल्याचे समोर येत आहे.
एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार मनी लाँड्रिंगशी संबंधित प्रकरणात दिल्ली, चंदीगड आणि उत्तराखंडमध्ये ईडीचे हे छापे टाकले जात आहेत. हरकसिंग रावत यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आणि अनुशासनहीनतेमुळे कॅबिनेट मंत्रिपदावरून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी 2022 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हरक सिंह यांच्यासोबत त्यांची सून अनुकृती गुसैन यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.





