Ecole T20 Cup 2024 :- सौरभ दोडकेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावार रिक्रिएशन क्लब संघाने मेव्हिरिक्स अकादमी संघावर ३ गडी राखून मात करताना, इकोल स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इकोल टी-२० करंडक स्पर्धेत आगेकूच केली.
शिंदे हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या लढतीमध्ये प्रथम फलंदाजी करताना मेव्हिरिक्स संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५७ धावा केल्या. शुभम तैस्वालने ४२ चेंडूत ४७ धावांची खेळी करताना ५ चौकार व १ षटकार लगावला. यशराज खाडेने २८ चेंडूत धमाकेदार नाबाद ४४ धावांची खेळी करताना १ चौकर व ४ षटकार तडकावले. संदीप शिंदेने ३५ धावा करताना त्याला सुरेख साथ दिली. सौरभ दोडके व रुद्राज घोसाळे यांनी प्रत्येकी २ तर संतोष दाभाडे व श्रेयस जीवने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केले.
AITA U-18 Tennis Tournament 2024 : डेनिका फर्नांडो दुहेरी मुकुटाची मानकरी…
रिक्रिएशन क्लब संघाने १९.४ षटकांत ७ बाद १५७ धावा करताना विजय साकारला. सलामीवीर श्रेयस जीवनेने ३५, सुजित उबाळेने ३५ तर सौरभ दोडकेने २० धावांची खेळी करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अनोष भोसलेने १९ तर साहिल कड याने २२ धावा करताना मोलाचे योगदान दिले. हरी सावंत व अक्षय वायकर यांनी प्रत्येकी २ तर संदीप शिंदे व वैभव गोसावी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.