satara | नागठाण्यात पर्यावरणपूरक वटपौर्णिमा साजरी

नागठाणे, (प्रतिनिधी) : येथील अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळाने वटपौर्णिमा दिवशी महिलांसाठी पर्यावरणपूरक आदर्श उपक्रम राबवून वटपौर्णिमा साजरी केली.
वटपौर्णिमा निमित्त गावातील 25 महिलांना प्रत्येकी एक वटवृक्षाचे (वडाचे झाड) वाटप करण्यात आले.
यावेळी वार्ड क्रमांक तीन व वार्ड क्रमांक दोन मधील महिलांनी विशेष सहभाग नोंदवला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ. वंदना सुतार यांनी वटवृक्षाचे महत्त्व महिलांना पटवून दिले.
सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे झाड म्हणून वडाचे झाड ओळखले जाते तसेच आयुर्वेदात वटवृक्षाचे झाडाच्या पानांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा वृक्ष प्रत्येक महिलेने वर्षभर जोपासायचा आहे.
एका वर्षानंतर पुढील वटपौर्णिमेला ज्या महिलांनी व्यवस्थित वटवृक्ष जगवला असेल अशा महिलांचा विशेष सन्मान देखील मंडळामार्फत करणार आहे असे मंडळाचे अध्यक्ष किरण साळुंखे यांनी सांगितले. नागठाणे पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक केले. या उपक्रमावेळी मंडळाचे सचिव तुकाराम निकम व मंडळाचे सभासद उपस्थित होते.





