ECI Chief Rajiv Kumar । महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांच्या घोषणेपूर्वी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईव्हीएमवर विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर दिले आहे. या प्रश्नाला उत्तर देताना राजीव कुमार म्हणाले, “जनता मतदानात सहभागी होऊन प्रश्नांची उत्तरे देतात. ईव्हीएमचा प्रश्न आहे तो 100 टक्के निर्दोष आहेत.” मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच या गोष्टी सांगितल्या आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, ईव्हीएम योग्य असल्याचे यापूर्वीही अनेकदा सिद्ध झाले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नाही. 4 दिवसांपूर्वी दिग्विजय सिंह यांनी उपस्थित केला होता सवाल ECI Chief Rajiv Kumar । हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यापासून पक्षाचे वरिष्ठ नेते यावर सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. निकालानंतर दुसऱ्याच दिवशी पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ईव्हीएममधील त्रुटी सांगितल्या. याप्रकरणी त्यांनी बॅटरीवर प्रश्न उपस्थित करत तक्रारही केली होती. यानंतर राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारी (11 ऑक्टोबर) ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केला. सध्याच्या ईव्हीएम व्यवस्थेमुळे मतदार म्हणून त्यांचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जात असल्याचे ते म्हणाले. पोस्टल बॅलेटच्या मोजणीनुसार मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच हरियाणा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने बहुतांश जागा जिंकल्याचा दावाही त्यांनी केला. रशीद अल्वी यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी केली ECI Chief Rajiv Kumar । त्याचवेळी काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे. ते मंगळवारी (15 ऑक्टोबर 2024) म्हणाले, “महाराष्ट्रातील विरोधकांनी ईव्हीएमऐवजी कागदी मतपत्रिकांद्वारे मतदान करण्याचा आग्रह धरला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील भाजप सरकार आणि निवडणूक आयोग काहीही करू शकतात. जर इस्रायलने पेजर आणि वॉकीटॉकी वापरल्या तर. तो लोकांना मारू शकतो, मग इस्त्रायलचा पंतप्रधान अशा गोष्टीत तरबेज आहे आणि त्यासाठी भाजप हे सगळे निवडणुकीपूर्वी करू शकते. हेही वाचा हरियाणाच्या मंत्रिमंडळात ‘या’ 4 महिलांचा होणार समावेश ; सावित्री जिंदाल यांना मिळेल का स्थान?