EC Press Conference | लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या मतमोजणीपूर्वी निवडणूक आयोगाकडून सस्पेन्स वाढवण्यात आला आहे. कारण आयोगाकडून आज पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. दुपारी साडेबारा वाजल्यापासून दिल्लीत ही पत्रकार परिषद आयोजित केली जाणार आहे. याबाबत माध्यमांना निमंत्रणही पाठवण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांना दिलेल्या या निमंत्रणात ‘२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत भारतीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद’ असे लिहिले आहे. निवडणुकीच्या समारोपाच्या वेळी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद आयोजित करण्याची देशाच्या निवडणूक इतिहासात ही बहुधा पहिलीच वेळ आहे. जयराम रमेशकडून ‘त्या’ पोस्टवर तपशील मागितला EC Press Conference | निवडणूक आयोगाने काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांच्याकडून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरील एका पोस्टद्वारे त्यांच्या सार्वजनिक वक्तव्याबद्दल तथ्यात्मक माहिती आणि तपशील मागितला होता. ज्यामध्ये केंर्दीय गृहमंत्री अमित शाह यांनी ४ जूनच्या मतमोजणीच्या काही दिवसांपूर्वी 150 जिल्हाधिकाऱ्यांना फोन करण्यात आले होते असा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्याकडून 2 जून 2024 च्या संध्याकाळपर्यंत उत्तर मागितले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान प्रक्रिया शनिवारी संपली होती. बहुतांश एक्झिट पोलमध्ये एनडीएला प्रचंड बहुमत EC Press Conference | दरम्यान, मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर बहुतेक एक्झिट पोलने भाकीत केले आहे की सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए या निवडणुकीत 2019 च्या रेकॉर्डपेक्षा चांगली कामगिरी करू शकेल. 2019 मध्ये एनडीए आघाडीने 352 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जिंकलेल्या 303 जागांपेक्षा भाजप यावेळी जास्त जागा जिंकू शकेल असा दावा दोन एक्झिट पोलने केला आहे. जर 4 जून रोजीचे निकाल एक्झिट पोलनुसार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तीन वेळा पंतप्रधान होणारे पहिले पंतप्रधान होतील. हेही वाचा लोकसभा निवडणुकीचे निकाल महाराष्ट्रातील सिनेमागृहात दाखवले जाणार ; तिकिटांची किंमत किती असणार ? वाचा सविस्तर