निवडणूक आयोगातर्फे साध्वी प्रज्ञा सिंहवर प्रचारबंदीची कारवाई

मध्य प्रदेश – साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने काही दिवसांपूर्वी बाबरी मस्जिद पाडल्याचा आपल्याला अभिमान आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. साध्वी यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. आचार संहितेचा भंग केल्या प्रकरणी निवडणूक आयोगातर्फे त्यांच्यावर ३ दिवसांसाठी प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली असून ही बंदी उद्या सकाळी ६ वाजल्यापासून लागू केली जाणार आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर देशभरामध्ये आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रचार सभांमध्ये राजकीय नेत्यांद्वारे आक्षेपार्ह्य भाषेचा वापर केला गेल्यास निवडणूक आयोगातर्फे प्रचारबंदीची कारवाई करण्यात येत आहे. यापूर्वी आयोगातर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर देखील प्रचारबंदीची कारवाई करण्यात आली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.