शिवराज्याभिषेक सोहळा दिनी खा. विखे यांचे वाद्यवादन
Updated On:

जामखेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जामखेड येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत ढोलताशा वाजविला. या बरोबरच लेझिम देखील खेळली. कार्यकर्त्यांचा या मिरवणुकीत एवढा उत्साह होता की, त्यांनी खा. विखे यांना खांद्यावर घेऊन डान्स केला.
“जय भवानी जय शिवाजी.. छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या. “जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्यावर सुजय विखे यांनी भगवा झेंडा हाती घेऊन तो फडकवला. जामखेड येथील शिवराज्याभिषेक सोहळा दिन जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा होत असताना मुलींनी साहसी खेळ केले. मुलांनी मल्लखांबवर चित्तथरारक कसरती केल्या. या मिरवणुकीत जामखेडसह पंचक्रोशातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





