Parle Melody : “मेलोडी खाओ, खुद जान जाओ…” ही ओळ केवळ जाहिरातीपुरती मर्यादित राहिली नाही, तर ९०च्या दशकातील पिढीच्या आठवणींचा एक भाग बनली. आता पुन्हा एकदा ही प्रसिद्ध टॅगलाइन चर्चेत आली आहे. याचं मागचं कारण म्हणजे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली दौऱ्यात जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni ) यांना भारताची प्रसिद्ध चॉकलेट ‘मेलोडी’चे पाकीट भेट म्हणून दिलं. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ९० च्या दशकातील ही लोकप्रिय टॉफी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडिया ‘मेलोडी’मय झाल्याचे दिसतयं. (Parle Melody ) Banana Benefits: रोज एक केळी खा आणि फरक स्वतः अनुभवा; केळीमुळे शरीराला मिळतील जबरदस्त फायदे खरं तरं, Melody लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वांची आवडती टॉफी आहे. बाहेरून कारमेल आणि आत चॉकलेट फिलिंग असलेल्या या टॉफीने अनेकांना एक सुंदर गोड चव दिली. (Parle Melody) अवघ्या १ रुपयाच्या पारले मेलोडीच्या टॉफीने कॅडबरी डेअरी मिल्क सारख्या परदेशी ब्रँडला टक्कर देत यशस्वी कामगिरी केली. इतकेच काय तर, Melody चॉकलेटच्या जाहिरताची एक रंजक कहाणी आहे. चला तर मग ती काय आहे ते जाणून घेऊयात… मेलोडी चॉकलेटची सुरुवात कोणी केली? मेलोडी चॉकलेटची मूळ कंपनी पारले जी आहे. १९२९ मध्ये मुंबईतील विलेपार्ले येथे एका छोट्याशा दुकानापासून या कंपनीची सुरुवात झाली होती. हळूहळू या कंपनीने देशापासून परदेशांपर्यंत आपले पाय रोवले आणि ती देशातील सर्वात जास्त विकली जाणारी बिस्किट ब्रँड बनली. (Parle Melody) या कंपनीचा पाया रचणारे मोहनलाल दयाल चौहान यांनी १९३८ मध्ये ‘पारले ग्लुको’ ची सुरुवात केली होती. चौहान कुटुंबाने सुरू केलेल्या या कंपनीने सुरुवातीला मिठाई आणि टॉफ्या बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर १९३९ मध्ये कंपनीने बिस्किट व्यवसायात पाऊल ठेवले आणि ‘पारले-जी’ सारख्या ब्रँडच्या माध्यमातून भारतातील घराघरांत स्थान मिळवले. त्यानंतर हळूहळू यामध्ये क्रॅकजॅक, पारले २०-२०, पारले मेलोडी, कच्चा आम, मेलोडी चोको आणि किस्मी बार यांसारखी नावे जोडली गेली. कंपनीने बिस्किटासोबत चॉकलेट मार्केटमध्येही प्रवेश केला, पण त्यांच्यासमोर कॅडबरी डेअरी मिल्क आणि नेस्ले मिल्कीबार सारख्या परदेशी ब्रँड्सचे मोठे आव्हान होते. डबल लेअर असलेली चॉकलेटी टॉफी लाँच (Parle Melody) १९८३ मध्ये पारलेने मेलोडी चॉकलेट लाँच केले. अवघ्या १ रुपयाच्या चॉकलेटसमोर डेअरी मिल्क आणि मिल्की बारसारखे मोठे ब्रँड्स होते, परंतु कंपनीने मार्केटिंगची अशी काही जादू चालवली की भलेभले ब्रँड्स फिके पडले. ( Parle Melody) डेअरी मिल्क आणि मिल्कीबार सारखी चॉकोलेट्स महाग असायची, जी मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारी नव्हती. अशा काळात पारलेने फक्त १ रुपयात डबल लेअर असलेली चॉकलेटी टॉफी लाँच केली आणि तिचे नाव ठेवले ‘Melody’. टॉफीच्या जाहिरातीने इतिहास घडवला ९० च्या दशकात टीव्हीवर या टॉफीच्या जाहिरातीने इतिहास घडवला होता. जाहिरातीत एक अतिशय साधा पण मजेशीर प्रश्न विचारला जायचा की, “ये मेलोडी इतनी चॉकलेटी क्यूँ है?” आणि त्याचे उत्तर असायचे, “मेलोडी खाओ, खुद जान जाओ.” ही टॅगलाईन तयार करण्याची जबाबदारी ‘एव्हरेस्ट’ या जाहिरात एजन्सीला देण्यात आली होती. या मोहिमेचे नेतृत्व हरेश मूरजानी करत होते. मुलांच्या मनात लगेच घर करणारी आणि सहज लक्षात राहणारी ओळ हवी होती. त्यातूनच कॉपीरायटर सुलेखा बाजपेयी यांनी “मेलोडी खाओ, खुद जान जाओ” ही ओळ लिहिली. Cyber Fraud: व्हाट्सअपवर आलेली ही PDF उघडण्यापूर्वी दोनदा विचार करा; नाहीतर होईल मोठं नुकसान कंपनीलाही ती इतकी आवडली की पुढे तीच मेलोडीची कायमस्वरूपी ओळख बनली. स्वस्त दर आणि उत्तम चव या खास गोष्टीमुळे मेलोडीला शहरे आणि गावांमधील लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय बनवली. विशेष म्हणजे, एका छोट्याशा टॉफीच्या जाहिरातीने तयार केलेली ही ओळ तीन दशकांनंतरही लोकांच्या ओठांवर आहे, हेच त्या जाहिरातीच्या यशाचं खरं उदाहरण मानलं जातयं. जे की आता मोदी आणि मेलोनी यांच्या भेटीनंतर ट्रेडिंग बनलं आहे. हेही वाचा: Banana Benefits: रोज एक केळी खा आणि फरक स्वतः अनुभवा; केळीमुळे शरीराला मिळतील जबरदस्त फायदे