हिंगोली : राज्यात कोरोनामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, हिंगोलीत सोमवारी रात्री एका पाठोपाठ एक असे पाच भूकंपाचे धक्के बसल्याचे सांगण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यात सोमवार म्हणजेच 27 एप्रिल रोजी रात्री10:31 पासून 11:20 पर्यंतच्या एका तासात 5 धक्के बसले. औंढा,वसमत, आणि कळमनुरी तालुक्यातील कोठार सुकळी, डोनवाडा, कुरुंदा, वाई, वडगाव, गिरगाव, सापळी, पांगरा शिंदे,चोंढी आंबा,चौंढी बहिरोबा, बोथी, तेलंगवाडी, पोत्रा, कवडा, जांब, दांडेगाव, बोल्ड वाडी, टव्हा, नांदापूर, सिंदगी, सालेगाव, पिंपळदरी याठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत.