ओडिशा : गंजाम व गजपती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली – ओडिशाच्या बेरहमपूर परिसरात शनिवारी सकाळी 7.10 वाजता भूंकपाचे सौम्य धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.8 नोंदवली गेली. नॅशनल सेंटर फाॅर सीस्मोलॉजीने याबाबत माहिती दिली आहे.

ओडिशाच्या गजपती आणि गंजम जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले.  रिश्टर स्केलवर याठिकाणच्या भूंकपाची तीव्रता 3.8 नोंदवली गेली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या भूंकपात कोणत्याही प्रकारच्या जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही. भुवनेश्वरच्या हवामान केंद्राच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सकाळी 7.10 च्या सुमारास गजपती येथे 3.8 तीव्रतेचा भूंकप झाला.

हवामान खात्याने आपल्या अधिकृत ट्विटर पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भूकंपाचे केंद्रबिंदू हे आर उदयगिरी क्षेत्राजवळील गंजाम जिल्ह्यातील परिभेटा आणि तांडीगुडा भागात होते.” गंजाम जिल्ह्यातील पात्रपूर आणि गजपती जिल्ह्यातील मोहना भागात भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यात कोठूनही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.