नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशात शनिवारी दुपारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी(राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र)ने याची पुष्टी केली आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशातील लोअर सुबनसिरी येथे दुपारी 12.41 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
An earthquake of magnitude 3.5 on Richter scale struck Lower SubanSiri, Arunachal Pradesh today at 12:41PM IST: National Centre for Seismology (NCS)
— ANI (@ANI) August 22, 2020
दरम्यान, यापूर्वी अरुणाचल प्रदेशतील तवांग भागात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9.46 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी भूंकपाच्या तीव्रेतची रिश्टर स्केलवर 3.0 एवढी नोंद झाली होती.