Italy Earthquake : इटलीत 5.0 रिश्टर स्केलचा भूकंप…

Italy Earthquake : इटलीच्या दक्षिणेकडील कॅलाब्रिया भागात शुक्रवारी रात्री उशिरा 5.0 तीव्रतेचा भूकंप झाला. मात्र, कोणतेही नुकसान झाले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जिओफिजिक्स अँड व्होल्कॅनोलॉजी (INGV) च्या मते, भूकंपाचा केंद्रबिंदू आयोनियन समुद्रावरील कोसेन्झा प्रांतातील पिएट्रापोलापासून तीन किलोमीटर पश्चिमेला होता.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले आहे की, “नुकसानीची कोणतीही बातमी नाही किंवा मदतीसाठी कॉल आल्याचा कोणताही अहवाल नाही. परंतु तपास चालू आहे.” ते पुढे म्हणाले की, ” आज झालेला भूकंप हा मागील भूकंपापेक्षा कमी शक्तिशाली होता, असं रहिवाशांना जाणवलं.”
M 5.0, Southern Italy 2024-08-01 19:43:21 39.49 16.74 31 km C – https://t.co/SbeWgsEg6b #HappeningNow #Alert #EarthquakeAlert pic.twitter.com/mgjTLudyGw
— Earthquakes Live (@earthquakeglobe) August 1, 2024
दरम्यान, इटलीमध्ये सरासरी दर चार वर्षांनी 5.5 किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप होतो. साल 2016 मध्ये 24 ऑगस्ट रोजी 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यामध्ये 247 लोकांचा मृत्यू झाला होता आणि डझनहून अधिक लोक बेपत्ता झाले होते. हा भूकंप नॉर्सियाजवळ आणि पेरुगियाच्या आग्नेय-पूर्वेस 75 किलोमीटरवर झाला होता.





