पृथ्वीबाबांनीच पुढील पंतप्रधान घोषित करावा! शिक्षण मंत्र्यांचे माजी मुख्यमंत्र्यांना आव्हान

मुुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असा डॉयलॉग मारणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा शालेय शिक्षण मंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला. पृथ्वीराज चव्हाण खुप हुशार आहेत, ते विदेशात शिकून आले आहेत. नरेंद्र मोदी जर पंतप्रधान होणार नाहीत, हा तुमचा राजकीय अभ्यास असेल तर मग पुढील पंतप्रधान कोण होणार हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी माजी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी विनोद तावडे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील जाहीर सभेत शरद पवार यांच्यावर टिका करत त्यांच्या मर्मावरच घाव घातला आहे. मोदी यांची टिका सुप्रिया सुळे यांना रुचली नाही. त्यामुळेच त्यांनी मोदीजी यांना कुटुंबाचा अनुभव नाही, असे वक्तव्य केले. पण नरेंद्र मोदी यांना एक भाऊ आहे. त्यांच्या भावाला मुले आहेत. त्यामुळे काका पुतण्याला काय करतो हे मोदींच्या कुटुंबातही दिसते आहे आणि पवारांच्याही कुटुंबात दिसते आहे. त्यामुळे हे वास्तव नरेंद्र मोदी यांनी समोर आणल्यानंतर ते स्विकारण्यापेक्षा विनाकारण चिडचिड करु नये, असा टोलाही तावडे यांनी सुप्रिया सुळे यांना लगावला.

पुण्यात उमेदवार मिळाल्याबद्दल अभिनंदन
कॉंग्रेसला अखेर पुण्यामध्ये उमेदवार मिळाला, त्याबद्दल कॉंग्रेसचे अभिनंदन करताना तावडे म्हणाले, मोहन जोशीं सारख्या कॉंग्रेस कार्यकर्त्यालाच तिकीट द्यायचे होते तर इतके दिवस कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या दबावाखाली प्रविण गायकवाडांचा प्रवेश करुन का थांबली होती, याचे उत्तर कॉंग्रेस पक्षाने दिले पाहिजे. पण शेवटी कॉंग्रेसला उमेदवार मिळाला, ही लोकशाहीसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.