PM Modi Slams TMC: पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात आज, गुरुवारी १५२ जागांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यातील १६ जिल्ह्यांत भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात थेट लढत होत आहे. पश्चिम बंगालमध्ये एका बाजूला पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू असताना, दुसरीकडे पंतप्रधान मोदी दुसऱ्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. दुसऱ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. (PM Modi Slams TMC) बंगालच्या कृष्णनगर येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “झालमुरी मी खाल्ली आणि झटका टीएमसीला लागला. ४ मे रोजी मिठाई आणि झालमुरी दोन्ही वाटल्या जातील.” पंतप्रधान म्हणाले की, “बंगालमध्ये शांततेत मतदान सुरू आहे. ५० वर्षांनंतर निवडणुकीतील हिंसाचारात घट झाली आहे, हे निवडणूक आयोगाचे यश आहे. बंगालमधून आता भीती जात असून विश्वास निर्माण होत आहे. पूर्वी येथे गुंडाराज चालायचे, पण आता जनता टीएमसीच्या ‘जंगलराज’च्या विरोधात उभी राहिली आहे. ज्यांनी जनतेला लुटले आहे, त्यांना ते परत करावे लागेल. टीएमसी घुसखोरांना संरक्षण देते. आता अत्याचारी आणि भ्रष्टाचाऱ्यांचा हिशोब होईल.” PM Modi Slams TMC: “पूर्वी येथे गुंडाराज चालायचा”; पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू अन् पंतप्रधान मोदींचा TMCवर प्रहार ‘ही निवडणूक जनता लढवत आहे’ (PM Modi Slams TMC) पुढे मोदी म्हणाले, “अनेक जिल्ह्यांत टीएमसीचे खातेही उघडणार नाही. १५ वर्षांपूर्वी डाव्यांच्या विरोधात जनतेने रणशिंग फुंकले होते, आज टीएमसीच्या विरोधात बंगालची जनता प्रत्येक गल्लीत शंखनाद करत आहे. ही निवडणूक मोदी किंवा माझे सहकारी लढवत नसून, बंगालची जनता स्वतः लढत आहे.” डॉक्टर, वकील, शिक्षक, सरकारी कर्मचारी आणि अगदी पोलीस दलही आता टीएमसीच्या दहशतीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या बाजूने मतदान करत असल्याचा दावा पंतप्रधानांनी केला. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान सकाळी ११ वाजेपर्यंत बंगालमध्ये ४१.११%, तर दुपारी १ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले आहे. हेही वाचा: Jay Pawar: जय पवारांचे २०२९च्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान; “मी उमेदवार व्हावं…”