E.K.Palaniswami : तमिळनाडूतील टीव्हीके सरकार सत्तेत राहण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप अण्णाद्रमुकचे प्रमुख इ.के.पलानीस्वामी (E.K.Palaniswami) यांनी केला. ते सरकार काही काळच टिकेल, असे भाकितही त्यांनी केले. पलानीस्वामी यांनी एक निवेदन जारी करत मुख्यमंत्री विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारवर (E.K.Palaniswami) टीकेची झोड उठवली. टीव्हीकेने लहान पक्षांचा आणि अण्णाद्रमुकमधील बंडखोर आमदारांचा पाठिंबा घेतल्याचा संदर्भ त्यांनी दिला. Edappadi K. Palaniswami टीव्हीकेला सरकार (E.K.Palaniswami) स्थापण्यासाठी बहुमताची जुळवाजुळव करावी लागली. त्या पक्षाकडे बहुमत नसल्याने द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापनेची चाचपणी केल्याचे वृत्त याआधी प्रसिद्ध झाले. मात्र, ते वृत्त खोटे असल्याचे पलानीस्वामी यांनी म्हटले. द्रमुकला राजकीय विरोध करण्यासाठी अण्णाद्रमुकची स्थापना झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. अण्णाद्रमुकने भाजप आणि इतर मित्रपक्षांच्या मदतीने तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढवली. त्या राज्यात एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या अण्णाद्रमुकला केवळ ४७ जागा जिंकता आल्या. त्यामुळे तमिळनाडूच्या सत्तेत परतण्याचे त्या पक्षाचे स्वप्न भंगले.