Maharashtra Cabinet Minister : आजपासून ई-कॅबिनेट बैठकीला सुरुवात; सर्व मंत्र्यांना आयपॅडचे वाटप, इतके कोटी केले खर्च, एका आयपॅडची किंमत…

State Govt eCabinet : राज्य सरकारने प्रशासनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या दिशेने एक पाऊल महत्वाचे पाऊल उचलले आहे. आजपासून महाराष्ट्र सरकारच्या ई-कॅबिनेटला सुरूवात करण्यात आली आहे. मुंबईतील मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना आयपॅडचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे ई-कॅबिनेटअंतर्गत मंत्र्यांना बैठकीतील प्रस्ताव आयपॅडद्वारे पाहता येणार आहेत.
शासनाने ई कॅबिनेटसाठीचे साहित्यासाठी १ कोटी ६ लाख ५७ हजार ५८३ रुपयांचा खर्च केले आहेत. यामध्ये 50 आयपॅड, 50 कीबोर्ड, 50 पेन्सिल आणि 50 कव्हरची खरेदी करण्यात आली आहे. एका आयपॅडची किंमत जवळपास 1 लाखांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. राज्य सरकारने 41 मंत्र्यांसाठी 50 आयपॅड आणि संबंधित उपकरणांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यानुसार या निर्णयाची आता प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली आहे. आज २४ जून रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना आयपॅडचे वापट करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकती मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी ई-कॅबिनेट संकल्पनेबाबत सादरीकरण केले होते.
कागदी कामकाजाला पूर्णपणे आळा बसू शकेल
त्यानंतर राज्य सरकारने यास सकारत्मकता दर्शविली होती. त्यानुसार वाटप करण्यात आलेल्या आयपॅडला प्रत्येक मंत्र्याला वैयक्तिक पासवर्ड प्रदान केला जाईल. यामुळे प्रस्तावांची गोपनीयता राखण्यास मदत होईल आणि कागदी कामकाजाला पूर्णपणे आळा बसू शकेल. आगामी काळात मंत्र्यांना या नव्या तंत्रज्ञानाची सवय झाल्यास मंत्रीमंडळ बैठकींचे स्वरूप पूर्णपणे डिजिटल होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.




