कोल्हापूर – लोकसभा निवडणुका निर्भयमुक्त वातावरणात व्हाव्या यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासना सोबत कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांनी बेकायदा दारू वाहतूक, बेकायदा अग्नीशस्त्रे बाळगणारे, बनावट नोटा छापणाऱ्या, गुटखा- गांजा बाळगणाऱ्या आणि घातक शस्स्त्रे, प्रतिबंधात्मक कारवाई अशापद्धतीच्या गुन्हे करणाऱ्या सुमारे ३ हजार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलीय.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यतल्या ४५ ठिकाणी स्थिर निरीक्षण पथकाने नाकाबंदी केली आहे. शेजारील गोवा आणि कर्नाटक राज्यातून स्वस्त मिळणारी दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातून आणण्यात येत आहे. त्यामुळे अशा वाहनांना लक्ष करून आत्तापर्यंत 50 लाखांची दारू प्रशासनाने जप्त केली. तर स्थिर निरीक्षण पथकांद्वारे 40 लाखाची रोख रक्कम, 20 लाखांच्या बनावट नोटा, 4 बंदुका आणि 55 जिवंत काडतुसे, 64 लाखांचा गुटखा पकडण्यात आला आहे. सीआरपीसी 107, सीआरपीसी 109, सीआरपीसी 110 नुसार मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे.