Rani Mukerji Sindoor Khela : दुर्गा मातेच्या भक्तीत तल्लीन झाली,’राणी मुखर्जी’ पहा ‘सिंदूर खेला’चा व्हिडिओ.

Rani Mukerji Sindoor Khela : नुकतेच पार पडलेल्या शारदीय नवरात्रीमध्ये संपूर्ण देश दुर्गा मातेच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला दिसून आला. देशभरात दुर्गापूजेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला गेला. प्रामुख्याने बंगाल आणि महाराष्ट्रात नवरात्री हा सण जल्लोषात साजरा केला जातो. विजयादशमीच्या पवित्र सणावर बॉलीवूड स्टार्सही माँ दुर्गा भक्तीत मंत्रमुग्ध झालेले दिसतात. विजयादशमीच्या निमित्ताने राणी मुखर्जी, तनिषा मुखर्जी, रुपाली गांगुली, सुमोना चक्रवर्ती अशा अनेक अभिनेत्री माँ दुर्गेच्या रंगात सजलेल्या दिसल्या.
View this post on Instagram
राणी मुखर्जी नवरात्रीच्या नऊ दिवस दुर्गा मंडपात उत्सव साजरा करताना दिसली. विजयादशमीलाही ती पारंपारिक लूकमध्ये दिसली. राणीने सिंदूर लावून पाहुण्यांचे स्वागत केले आणि राणी स्वतः सिंदूर लावून रंग खेळतांना दिसली. यावेळी राणीने जोमाने सिंदूर खेला ही बंगालीची पारंपरिक प्रथा साजरी केली. यावेळी राणीने जोरदार डान्सही केला. तिचे मंडपातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राणीच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, तिने गोल्डन आणि रेड एम्ब्रॉयडरी सिल्क साडी नेसलेली होती. तिने बंगाली स्टाईलमध्ये साडी नेसली होती. यासोबत तिने हातात बांगड्या आणि कानात सोन्याचे मोठे स्टड घातले होते. राणीने कपाळावर लाल रंगाची बिंदी लावली होती आणि या लूकसह तिचे केस खुले ठेवले होते.
विजयादशमीच्या वेळी राणी मुखर्जी तिच्या मामासोबत डान्स करतानाही दिसली. याशिवाय काजोलची बहीण आणि अभिनेत्री तनिषा मुखर्जीनेही या फेस्टिव्हलला हजेरी लावली होती. यावेळी तनिषा लाल रंगाची बनारसी साडी नेसलेली दिसली. स्लीव्हलेस ब्लाउज, हेवी गोल्डन ज्वेलरी आणि लाल बिंदीसह तिने हा लूक पूर्ण केला. अभिनेत्रीने मराठी स्टाईलमध्ये साडी नेसली होती आणि तिने तिच्या कमरेला बेल्ट देखील बांधला होता. या लूकमध्ये तनिषा खूपच सुंदर दिसत होती.




