बांधकाम क्षेत्राने भरली पालिकेची तिजोरी

निश्‍चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा 55 कोटी अधिक
गेल्या वर्षाच्या तुलनेत 111 कोटींनी वाढले
उत्पन्नबांधकाम परवानगीतून मिळाले 510 कोटी

पिंपरी – बरीच वर्षे मंदी झेलेल्या बांधकाम व्यवसायास सध्या अच्छे दिन आले आहेत. याचा थेट फायदा पिंपरी-चिंचवड महापालिकेला होताना दिसत आहे. बांधकाम परवानगीतून महापालिकेला आर्थिक वर्ष 2018-19मध्ये तब्बल 510 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. पालिकेने निश्‍चित केलेल्या उदिष्टापेक्षा हे उत्पन्न तब्बल 55 कोटी अधिक आहे तर गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी 111 कोटी रुपयांनी बांधकाम परवानगीतून उत्पन्न वाढले आहे.

मंदीचे ढग हटल्यानंतर शहर व उपनगर परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रकल्प सुरू झाले. बांधकाम करण्यासाठी पालिकेकडून घ्यावयाच्या परवानगी शुल्काच्या माध्यमातून दरवर्षी पालिकेला शेकडो कोटी रुपयांचे उत्पन्न होते. 2018-19 या आर्थिक वर्षाने मार्गील सर्व आकड्यांना खूप मागे टाकत पाचशे कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 20019-10 पासूनचे आकडे पाहता सुरुवातीला सुमारे 100 कोटी रुपये पालिका बांधकाम परवानगीतून मिळवत होती. दरवर्षी हा आकडा वाढत 2013-14 पर्यंत 334.33 कोटींपर्यंत पोहचला होता. परंतु 2014-15च्या आर्थिक वर्षांत हा आकडा पुन्हा 239.03 कोटीपर्यंत खाली उतरला. परंतु बांधकाम क्षेत्रासाठी घेण्यात आलेल्या काही निर्णयांमुळे बांधकाम क्षेत्राने पुन्हा उचल घेण्यास सुरुवात केली.

2015-16 मध्ये पुन्हा उत्पन्नाच्या आकड्याने तीनशे कोटींचा टप्पा ओलांडत थेट 364 कोटींपर्यंत मजल मारली होती. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन बांधकामांचे प्रमाण आता पुन्हा वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. राहण्यासाठी परवडणाऱ्या दरांपासून ते लक्‍झरियसपर्यंत आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने बांधण्यात आलेल्या सदनिकांचे गृह प्रकल्प साकारण्यात येत आहेत. नव्याने पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये देखील मोठ्या पम्राणावर गृहप्रकल्प सुरू आहेत. मोशी, चऱ्होली, पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत या परिसरांसोबतच मुख्य शहरांमध्ये देखील विविध प्रकल्प सुरू असल्याचा पालिकेला फायदा झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.