satara | लोकसभा निवडणुकीमुळे नेत्यांची पावले गावांकडे
Updated On:

भिलार, (वार्ताहर)- लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी उमेदवारांची पावले ग्रामीण भागातील गावांकडे वळू लागली आहेत. भिलारमध्ये मागील आठवड्यात उदयनराजे भोसले यांनी उपस्थिती लावून गावकऱ्यांशी संवाद साधला.
त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीही भिलार गावात येऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. कै. बाळासाहेब भिलारे व कै. भि. दा. भिलारे गुरुजी यांच्या आठवणीला शशिकांत शिंदे यांनी उजाळा दिला.
शशिकांत शिंदे यांची सभा होते ना होते ते लगेच दुसऱ्या दिवशी आमदार मकरंद पाटील यांनी भिलार येथे सभा घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सांगतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहावे, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन मकरंद पाटील यांनी केले.





