Nagar | लग्न जमत नसल्याच्या निराशेपोटी युवकाने स्वता:च्या हातावर केले वार!

नेवासा (प्रतिनिधी) – सावखेडा (ता.गंगापूर जि.छञपती संभाजीनगर) येथील एका ३१ वर्षिय युवकाने स्वतःचे लग्न जमत नाही म्हणून चक्क निराशेपोटी आपल्या हातावर मद्य प्राशान करुन ब्लेडने वार करुन घेत लग्न न जमन्याच्या कारणावरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास केला.
माञ सुदैवाने नेवासा पोलीस ठाण्याचे वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार किरण गायकवाड आणि ग्रामस्थांनी या युवकाला पकडून नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात वेळीच दाखल केल्यामुळे या युवकाचे अखेर प्राण बचावले.
याबाबत सविस्तर अधिक वृत्त असे की, सावखेडा (जि.छञपती संभाजीनगर) येथील रहवासी असलेल्या गोविंद कृष्णा ठोकळ (वय ३१) या युवकाने नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकासमोर उभे राहून मद्यधुंद अवस्थेत चक्क ब्लेडने स्वता:च्या हातावर वार करुन घेत लग्न न जमण्याच्या कारणामुळे निराश होवून स्वता:ची जीवन याञा संपविण्याचा प्रयत्न केला.
माञ या युवकाला नेवासा पोलीस ठाण्याचे वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार किरण गायकवाड आणि संदिप वाखुरे यांच्यासह काही युवकांनी पकडून त्याला तातडीने नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचले आहेत
मद्यधुंद अवस्थेत त्याने हा प्रकार केलेला असून स्वता: त्याने आपले लग्न होत नसल्यामुळेच हे कृत्य केल्याचे यावेळी त्याने सांगितले माञ नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी आणि परिचारीकांसह कर्मचाऱ्यांनी वेळीच त्याला मदत केल्यामुळे या युवकाचे अखेर प्राण वाचले आहेत.





