आर्थिक स्थितीचा श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डलाही फटका, ‘या’ स्पर्धेचे यजमानपद धोक्यात?
Updated On:

दुबई – श्रीलंकेतील राजकीय परिस्थिती व देशात झालेल्या आर्थिक संकटामुळे आगामी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपदही जाणार असल्याचे संकेत आशियाई क्रिकेट समितीने दिले आहेत.
टी-20 सामन्यांची ही स्पर्धा येत्या 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत श्रीलंकेत होणार होती. मात्र, आता ती अन्यत्र हलवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. श्रीलंका सध्या आर्थिक मंदीचा सामना करत आहे. देशातील या परिस्थितीमुळे त्यांना या स्पर्धेचे यजमानपद गमवावे लागणार आहे. ही स्पर्धा अमिराती किंवा अन्य ठिकाणी खेळवली जाणार असल्याचे दिसत आहे.





