पुणे – दौंड-सोलापूर रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे पुणे-सोलापूर रेल्वे सेवेवर त्याचा प्रभाव पडणार आहे. या मार्गावर दर शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या ब्लॉकमुळे पुणे-सोलापूर रेल्वे सेवा अंशत: विस्कळित होणार असून, नागरिकांनी याची दखल घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
सोलापूर ते दौंड या रेल्वेमार्गावर सुरू असलेले रुळांचे काम आणि या मार्गांवरील स्थानकांचे व्यवस्थापन अशा कारणास्तव पुणे-सोलापूर रेल्वे मार्गावर 31 मेपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी ब्लॉक असणार आहे. यामुळे या मार्गादरम्यान धावणाऱ्या काही रेल्वे गाड्यांच्या सेवेवर परिणाम होणार आहे. यामध्ये 12169/12170 इंटरसिटी एक्स्प्रेस ही गाडी 6 एप्रिल ते 26 मे दरम्यान दर शनिवारी, रविवारी रद्द करण्यात आली आहे. सोलापूर ते पुणे धावणारी 71414 ही डेमू 4 एप्रिल ते 31 मेपर्यंत दर शनिवारी आणि रविवारी सोलापूर ते कुर्डूवाडीपर्यंत तर 71415 ही गाडी पुणे ते भिगवणपर्यंत धावेल.
तसेच, पुणे-हैद्राबाद एक्स्प्रेस सेवेवरदेखील या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.