डीएसके प्रकरण- पैसे वाटपाच्या वेळी गुंतवणूकदारांना प्राधान्य देण्याची न्यायालयात मागणी

पुणे – गुंतवणूकदारांची फसवणूक केलेल्या बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डीएसके यांच्या संपत्तीचा लिलाव झाल्यानंतर त्यातून आलेल्या पैशांच्या वाटपावेळी ठेवीदारांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करणारा अर्ज गुंतवणूकदारांकडून न्यायालयात करण्यात आला आहे. विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे. लवकरच यावर सुनावणी होणार आहे.

गुंतवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून डीएसकेच्या अनेक कंपन्यांमधून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. डीएसके, पत्नी, मुलगा यांच्यासह काही नातेवाईक आणि कंपनीचे अधिकारी या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. फसवणूक झालेल्या अनेक गुंतवणूकदारांना आता पैशाची गरज आहे. कुणाला आजारपण, तर, कुणाला इतर कौटुंबिक समस्या सतावत आहेत. बॅंका आणि सरकारकडे असलेल्या देय रक्कम वसूल करण्यासाठी इतर पर्याय आहेत. पैसे आल्यानंतर ते सरकार आणि बॅंकांना देण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे हा अर्ज करण्यात आल्याची माहिती अर्जदारांचे वकील ऍड. सुदीप केंजळकर यांनी दिली. डीएसके यांनी न्यायालयात जमा केलेले 6 कोटी 65 लाख रुपये आणि त्यांची महागडी वाहने विकल्यानंतर त्यातून जमा झालेली रक्कम ठेवीदारांमध्ये कशा पद्धतीने वाटता येईल, याचा आराखडा तयार करून न्यायालयात सादर करण्याचे आदेश यापूर्वी न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दिला आहेत. यापूर्वी देखील ठेवीदारांकडून अशा प्रकारचा अर्ज करण्यात आला असल्याचेही ऍड. केंजळकर यांनी यावेळी सांगितले. यावर न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.