Shikrapur : बैलांच्या मिरवणुकीत ढोल पथक, फुलांची उधळण
Shikrapur : ओंकार कर्डिले, माजी चेअरमन निलेश थोरात, प्रगतशील शेतकरी स्वप्नील करंजे, सिकंदर शेख, बैलगाडा शौकीन आमीर शेख, भूषण आळंदीकर, सोहम गायकवाड आदींनी बैलांच्या मिरवणुका काढल्या.

शिक्रापूर : बैलपोळा हा शेतकऱ्यांच्या बैलांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि शेतकऱ्यांच्या आवडीचा सण या दिवशी शेतकरी आपल्या बैलाचा उपवास करुन बैलांना आंघोळ घालून बैलांना रंगवून पूजा करीत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिक्रापूर परिसरात मोठ्या जल्लोषात बैलपोळा साजरा करण्यात आला आहे.
शिक्रापूरसह परिसरातील अनेक ठिकाणी बैलपोळा साजरा होत असताना शिक्रापूर येथील उद्योजक ओंकार कर्डिले, आमीर शेख यांनी ढोल पथकाच्या ताफ्याच्या नृत्याने तर माजी चेअरमन निलेश थोरात यांनी चक्क जेसीबीने फुलांची उधळण केली. बैलांच्या पुढे ऑर्केस्ट्रा ठेवत बैलांच्या विशेष मिरवणुकीचे आयोजन केले होते. दरम्यान, बैलांची मिरवणूक निघालेली असताना पन्नास युवक युवतींच्या ढोल ताशांच्या ताफ्यात बैलांची गावातून मिरवणूक निघताच नागरिक जल्लोष करु लागले.
ओंकार कर्डिले, माजी चेअरमन निलेश थोरात, प्रगतशील शेतकरी स्वप्नील करंजे, सिकंदर शेख, बैलगाडा शौकीन आमीर शेख, भूषण आळंदीकर, सोहम गायकवाड आदींनी बैलांच्या मिरवणुका काढल्या. राऊतवाडी, वाबळेवाडी, चाकण रोड परिसरात शेतकऱ्यांनी त्यांच्या बैलांची प्रत्येक भागात स्वतंत्र मिरवणूक काढली असल्याने शेतकऱ्यांचे बैलांवरील प्रेम दिसून आले.
यावेळी यांत्रिकीकरणाच्या काळात देखील शेतकऱ्यांनी बैलांचा सांभाळ केल्याने तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष उत्तम गायकवाड यांच्या वतीने चेअरमन निलेश थोरात व प्रगतशील शेतकरी सिकंदर शेख यांचा सन्मान करण्यात आला. यापुढे बैलपोळा मिरवणुकीत जास्तीत जास्त बैलजोड्या सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उत्सवाचे आयोजक ओंकार कर्डिले, निलेश थोरात, अमीर शेख यांनी सांगितले.
शंभू व शिवा बैल ठरले लक्षवेधी
शिक्रापूर येथे बैलपोळ्यानिमित्त निघालेल्या बैलांच्या मिरवणूकमध्ये बैलगाडा मालक अमीर शेख यांचा शंभू व निलेश थोरात यांचा शिवा ही बैले बैलगाड्याची असल्याने बैले एका जागेवर शांत उभा न राहता नुसते बेफान होत असल्याने शंभू व शिवा ही बैले लक्षवेधी ठरली आहे.





