Drugs Seized : अंदमानमध्ये तब्बल 6 हजार किलो ड्रग्ज जप्त; देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई

नवी दिल्ली : भारतीय तटरक्षक दलाने अंदमान समुद्रात सुमारे 6 हजार किलो अमली पदार्थांची मोठी खेप जप्त करण्यात आली आहे. ही खेप मासेमारी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटीतून करण्यात आणली जात होती. संरक्षण अधिकाऱ्यांकडून देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी खेप असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी ही कारवाई केली.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तटरक्षक दलास नियमित गस्तीवर असताना पोर्ट ब्लेअरपासून सुमारे 150 किमी अंतरावर असलेल्या बॅरेन आयलँडजवळ मासेमारी करणाऱ्या बोटीची संशयास्पद हालचाल निदर्शनास आली. यानंतर ट्रॉलरला चेतावणी देण्यात आली. तसेच बोटीला पुढील तपासासाठी पोर्ट ब्लेअरला आणले. या ठिकाणी तपासणी केली असता बोटीत प्रत्येकी २ किलोच्या सुमारे ३ हजार पॅकेटमध्ये अंमली पदार्थ आढळून आले.
याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत हजारो कोटी रुपये किंमत आहे. याप्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने सहा म्यानमारच्या कर्मचाऱ्यांसह एक जहाज जप्त केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या कारवाईची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. अंमली पदार्थांची तस्करी आणि कार्टेलवर कारवाई करताना अंमली पदार्थ विरोधी एजन्सींनी सर्व बाबी जप्त केल्या आहेत.
या महिन्याच्या सुरुवातीला जवळपास 700 किलोग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केले होते. या कारवाईत आठ इराणी नागरिकांना अटक करण्यात आली होती.





