बारामती – करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी येथील आधार फाउंडेशनच्या वतीने ढेकळवाडी, सोनगाव, झारगडवाडी, डोर्लेवाडी तसेच सपकळवाडी या पाच गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराइड औषध फवारणी करण्यात आली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवराज जाचक यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा खर्च टाळून औषध फवारणी केली. यावेळी सरपंच बाळासाहेब बोरकर, नवनाथ सोलंकर, आरोग्य केंद्राचे दिलावर शेख, पोलीस पाटील चेतन ठोंबरे, ग्रामसेवक सतिश गायकवाड, ढेकळवाडी ग्रामपंचायतचे कर्मचारी भागवत हांडे, पोपट गरदडे यांचेही सहकार्य मिळाले