मुंबई : कॉर्डिला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नार्कोटिक कंट्रोल ब्युरो अर्थात NCB पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. कारण एनसीबीने मुंबईत पुन्हा छापेमारी केली. NCB ने बॉलिवूड चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले. वांद्रे परिसरात छापेमारीला सुरूवात झाली.
सीबीआय सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास प्रत्येक बाजूने करत आहे. सीबीआयने या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली होती. या दरम्यान इम्तियाजबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले होते. सुशांत आणि इम्तियाजचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा सुशांतच्या प्रकरणाचा तपास सुरू झाला, तेव्हा इम्तियाज गायब झाला होता, त्यानंतर त्याचा संशय बळावला होता.
मुंबई-गोवा क्रूझ पार्टीत अटक करण्यात आलेल्या अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव समोर आल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर छापेमारीला सुरुवात झाली. एनसीबीची एक टीम वांद्रे परिसरात आहे.
2 ऑक्टोबरला एनसीबीने कॉर्डिला शिपवर छापेमारी करुन अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेऊन अटक केलं. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याचा मुक्काम आर्थर रोड जेलमध्ये आहे.
इम्तियाज खत्री हा बॉलिवूडमधील नामांकित निर्माता आहे. त्याने हिंदीसह मराठी सिनेमांचीही निर्मिती केली आहे. सुबोध भावेचा हृदयांतर या सिनेमाची निर्मिती केली आहे. इम्तियाज खत्री हे नाव सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात होतं
बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात इम्तियाज खत्री यांचं नाव आहे.