Drone: उत्सवात विनापरवाना ड्रोन उडविल्यास थेट जप्ती
Drone:

विशेष जप्ती पथक तैनात; पाच दिवस रात्री बारापर्यंत डीजेला सवलत
Drone: गणेशोत्सवाच्या काळात गर्दीच्या ठिकाणी विनापरवाना ड्रोन उडविणाऱ्यांवर आता थेट जप्तीची कारवाई केली जाणार आहे. गणेश मंडप, देखावे, विसर्जन मिरवणूक आणि गर्दीच्या परिसरात विनापरवाना ड्रोन उडवता येणार नाही. त्यासाठी शहरात विशेष ड्रोन जप्ती पथक तैनात करण्यात आले असून, गर्दीच्या ठिकाणी ड्रोनच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मध्यवर्ती पुण्यासह शहराच्या विविध भागांत मोठी गर्दी होते. देखावे पाहण्यासाठी येणारे भाविक, गणेश मंडळांचे कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकीमुळे प्रमुख रस्ते गर्दीने फुलून जातात. अशा परिस्थितीत विनापरवाना ड्रोनचा वापरल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे
परवानगीशिवाय ड्रोनचा वापर केल्याचे आढळल्यास जप्ती पथकाकडून तत्काळ कारवाई केली जाणार आहे. विशेषतः गर्दीची ठिकाणे, गणेश मंडप, देखावे, तसेच विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर पथकाची करडी नजर राहणार आहे. उत्सवाचे छायाचित्रण किंवा चित्रण करण्यासाठी ड्रोनचा वापर करणाऱ्यांनी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे.
दरम्यान, गणेशोत्सवातील गर्दी लक्षात घेऊन १९, २०, २२, २३ आणि २५ सप्टेंबर या पाच दिवशी रात्री बारापर्यंत गणेश मंडळांचे देखावे खुले ठेवण्यास, तसेच ध्वनिक्षेपक आणि डीजे वापरण्यास सवलत देण्यात आली आहे.
त्यामुळे या दिवशी रात्री उशिरापर्यंत शहरातील प्रमुख गणेश मंडप आणि विसर्जन मार्गांवर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर ड्रोनबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी विशेष यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
जरांगेचा परवानगीसाठी अर्ज Drone:
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक नेते मनोज जरांगे हे मुंबईकडे निघाले असून, एक दिवस पुण्यात मुक्कामी राहणार आहेत. या कालावधीत ते शहरातील काही ठिकाणी भेटी देणार आहेत. त्यासाठी त्यांच्या समर्थकांनी पुणे पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र, या अर्जावर पोलिसांकडून अद्याप परवानगी देण्यात आली नसल्याचे समजते.





