पुणे -पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातांचे प्रमाण अधिक असून, रात्रीच्या वेळेस अपघातांची संख्या अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सतत अपघात घडणाऱ्या अपघात प्रवण क्षेत्राचे जिओटॅगिंग करण्याचे काम सुरू आहे. अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात आली. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने रस्ता सुरक्षामध्ये इतर कार्यालयाच्या सहकार्याने जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना व प्रबोधनपर कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्यातूनच जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघातांच्या व मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. आरटीओ कार्यालयाने जानेवारी 2022 व जानेवारी 2023 या महिन्यातील रस्ते अपघाताचे तुलनात्मक विश्लेषण केले. त्यावेळी दिवसा व रात्री झालेले अपघात यामध्ये रात्री झालेल्या अपघाताची संख्या जास्त आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराचे पत्र सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट परिधान करूनच कार्यालयाच्या आवारात प्रवेश करावा. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा “आरटीओ’कडून देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, महाविद्यालय आणि बॅंका इत्यादी विभागांनी कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापराबाबत पत्र दिले आहे, अशी माहिती “आरटीओ’कडून देण्यात आली. शिरूर, जुन्नरही आघाडीवर रस्त्यावर वाहनांची संख्या रात्रीच्या वेळी कमी असून देखील अपघातांची संख्या जास्त संध्याकाळी सहा ते नऊ आणि पहाटे दोन ते पाच यावेळी अपघातांची संख्या अधिक केवळ मोटार सायकल अपघातांचे व पादचारी यांचे अपघातांचे प्रमाण एकूण अपघातांच्या तब्बल 90 टक्के -पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, शिरूर तालुका, जुन्नर तालुका येथे सर्वाधिक अपघात