कान्हे : कान्हे, नायगाव, कामशेत, येवलेवाडी, पवनानगर रोड तसेच मुंबई पुणे महामार्ग लगत गावच्या हद्दीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढलेला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उघड्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे त्या परिसरात श्वानांची संख्या वाढत आहे. मागील काही महिन्यांपासून या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढते आहे. मुंबई पुणे महामार्ग नायगाव कान्हे तसेच कामशेत पवनानगर रोड या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांना वृद्ध व्यक्तीवर तसेच शालेय विद्यार्थी या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत. नागरिकांना या मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. दुचाकीचालकांमध्ये भीती कामशेत पवना नगर रोड मुंबई पुणे महामार्गाने जाणाऱ्या दुचाकीस्वरांनादेखील या श्वानांमुळे त्रास होत आहे. वाहनावर भुंकणे, मागे धावणे यामुळे चालकांमध्ये भीती आहे. येथील रस्त्यावरील , खड्डे आणि पावसाच्या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासातून वाट काढणाऱ्या वाहन चालकांना आता येथील भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला सुद्धा सामोरे जावे लागते आहे, . कामशेत पवनानगर रोडवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकलाे जातो यामुळे या ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर अधिक आहे. वाहनांच्या मागे श्वान धावत असतात, यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. – योगेश देसाई स्थानिक नागरिक मुंबई पुणे महामार्गावर असलेले हॉटेल, चिकन व्यावसायिक यांच्याकडून या रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो. या कचऱ्याच्या ठिकाणी कुत्री जमलेली असतात. ही कुत्री दुचाकीस्वारांच्या पाठीमागे धावतात यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने यांचा बंदोबस्त करावा – लहू चोपडे, स्थानिक नागरिक, नायगाव