पुणे – सहकारनगर येथे 45 वर्षीय व्यक्ती त्याच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. दरम्यान, त्याने साधारणपणे तीन ते चार दिवसांपूर्वी गळफास लावला असावा, असे सहकारनगर पोलिसांनी सांगितले.
इंद्रजीत बनकर असे या आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून, तो व्यवसायाने वाहनचालक होता. या घराच्या परिसरात दुर्गंधी पसरल्याने स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना बोलावले. दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडण्यात आला. यानंतर समोर एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, असे पोलिसांनी सांगितले.
सहकारनगरचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनागे म्हणाले, “संबंधित व्यक्ती लॉकडाऊन काळात घरी होता. तो मूळचा चाकण येथील असून, सहकारनगर येथे भाड्याने राहत होता.’