Drishyam 3 Box Office Collection : ‘दृश्यम 3’ची दमदार सुरुवात; अजय देवगणच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग, पहिल्याच दिवशी ‘इतक्या’ कोटींची कमाई
Drishyam 3 Box Office Collection ‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीमधील हा महत्त्वाचा भाग मानला जात असल्याने प्रेक्षकांना विजय आणि त्याच्या कुटुंबाची पुढची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकता होती.

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगण, तब्बू आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दृश्यम 3’ अखेर 2 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता होती. अॅडव्हान्स बुकिंगलाही चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘दृश्यम 3’ने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, बातमी लिहिली जात असताना चित्रपटाने 66.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. दिवसाचा पूर्ण आकडा समोर आल्यानंतर यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अजय देवगणच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग
‘दृश्यम 3’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईने अजय देवगणच्या करिअरमधील आधीचा ओपनिंग डेचा विक्रमही मागे टाकला आहे. याआधी ‘सिंघम अगेन’ हा अजय देवगणच्या सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट होता. ‘सिंघम अगेन’ने पहिल्या दिवशी 43.70 कोटी रुपयांची कमाई केली होती.
आता ‘दृश्यम 3’ने पहिल्याच दिवशी 66.75 कोटींचा आकडा गाठल्याने तो अजय देवगणच्या करिअरमधील सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबरची सुट्टी आणि चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता यामुळे रात्रीच्या शोमधील कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Drishyam 3 Box Office Collection Day 1
विजय साळगावकरच्या भूमिकेत अजय देवगणची वापसी
‘दृश्यम 3: द कन्क्लूजन’चे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. या चित्रपटात अजय देवगण पुन्हा एकदा विजय साळगावकरच्या भूमिकेत दिसत आहे. ‘दृश्यम’ फ्रँचायझीमधील हा महत्त्वाचा भाग मानला जात असल्याने प्रेक्षकांना विजय आणि त्याच्या कुटुंबाची पुढची कहाणी जाणून घेण्याची उत्सुकता होती.
चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्ता, मृणाल जाधव, रजत कपूर, प्रकाश राज आणि जयदीप अहलावत यांच्या भूमिका आहेत. चित्रपटाला फ्रँचायझीचा शेवटचा भाग म्हणून सादर करण्यात आले आहे.
‘प्रेम कीटाणु’ची सुरुवात मात्र साधी
‘दृश्यम 3’सोबत 2 ऑक्टोबर रोजी वीर पहाडिया आणि आफिया सैयद यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘प्रेम कीटाणु’ हा चित्रपटही प्रदर्शित झाला. मात्र पहिल्या दिवसाच्या कमाईत दोन्ही चित्रपटांमध्ये मोठी तफावत दिसून आली. उपलब्ध आकडेवारीनुसार, ‘प्रेम कीटाणु’ने पहिल्या दिवशी 1.18 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे सध्या बॉक्स ऑफिसवर ‘दृश्यम 3’ची चर्चा अधिक आहे.
आता आगामी शनिवार-रविवार आणि पुढील दिवसांमध्ये ‘दृश्यम 3’ची कमाई किती वाढते, याकडे चित्रपटाच्या निर्मात्यांसह प्रेक्षकांचेही लक्ष लागले आहे. पहिल्या दिवसाचा आकडा पाहता चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.





