‘सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।’ भाजपनं २०२४ साठी लॉन्च केली जबरदस्त कॅपेन थीम

Lok Sabha Election 2024 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ( २०२४ ) भाजपने आज थीम सॉन्ग लाँच केले आहे. ‘सपने नहीं, हकीकत बुनते हैं। तभी तो सब मोदी को चुनते हैं।’ असे देण्यात आले आहे.आज लॉन्च झालेल्या व्हिडिओमध्ये उज्ज्वला, डीबीटी, प्रत्येक घरापर्यंत नळाचे पाणी, प्रधानमंत्री आवास योजना आणि केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण यासह विविध क्षेत्रे दाखवण्यात आली आहे, ज्यावर भाजप सरकारने उत्तम काम केल्याचा दावा केला आहे.
#WATCH | BJP launches new campaign for the upcoming Lok Sabha elections 2024 – ‘Modi ko chunte hain’ pic.twitter.com/bblzdEMDDY
— ANI (@ANI) January 25, 2024
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तरुण मतदारांना सांगितले की, ते त्यांच्या मताद्वारे देशाची दिशा आणि स्थिती ठरवतील. पीए मोदी तरुण मतदारांना म्हणाले, ‘कायम सरकार मोठे निर्णय घेते, आमच्या सरकारने अनेक दशकांपासून प्रलंबित प्रश्न सोडवले. 10-12 वर्षांपूर्वीच्या परिस्थितीने देशातील तरुणांचे भविष्य अंधकारमय केले होते’ .
तरुण मतदारांना संबोधित करतांना मोदी पुढे म्हणाले, “पूर्वी भ्रष्टाचार आणि घोटाळे हे मथळे बनत असत, आता ते विश्वासार्हता आणि यशोगाथांबद्दल आहे. तुमची स्वप्ने हा माझा संकल्प आहे ही मोदींची हमी.’ असेही ते म्हणाले आहे.





