विश्वकरंडक खेळायचे स्वप्न – श्रीशांत
Updated On:

मुंबई – बंदीचा कालावधी पूर्ण केल्यावर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याच्या तयारीत असलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत याने भारतीय संघाकडून 2023 साली होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न असल्याचे व्यक्त केले आहे.
बंदीचा कालावधी संपल्यानंतर तो यंदाच्या मोसमात सुरू होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज बनला आहे. केरळ क्रिकेट संघटनेने या स्पर्धेसाठी निवडलेल्या संभाव्य संघात श्रीशांतचा समावेश केला आहे.
श्रीशांतने 2011 साली भारतासाठी आणि 2013 साली केरळकडून अखेरचा सामना खेळला होता. 2023 साली होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेत भारताकडून खेळण्याचे स्वप्न असल्याचे त्याने सांगितले आहे.





