तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी चा नववा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. किरण ओसवाल यांनी नवीन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. तर सुरेश दाभाडे यांनी सेक्रेटरी पदाची सूत्रे हाती घेतली. याप्रसंगी डॉ. दीपक शहा यांना तळेगाव रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जैन इंग्लिश स्कूल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मोहनभाई पालेषा, विधीतज्ञ सोहनलाल जैन, अजित वाळुंज, विलास काळोखे, दादासाहेब उरे, मनोज ढमाले, शशिकांत हळदे, राजेश गाडे, संतोष शेळके, नितीन शहा, संजय मेहता यांसह तळेगाव परिसरातील विविध रोटरी क्लबचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. मोहनभाई पालेशा, किरण ओसवाल आदींनी यावेळी मनोगत व्यक्त केले. पुरस्कारामुळे जबाबदारी वाढली – तळेगाव दाभाडे शहर हे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शहर म्हणून ओळखले जाते. घरच्या गावात मला मिळालेल्या पुरस्कारामुळे माझी सामाजिक जबाबदारी वाढली आहे, असे उद्गार डॉ. दीपक शहा यांनी काढले. यावेळी असिस्टंट गव्हर्नर पदी निवड झाल्याबद्दल माजी अध्यक्ष दीपक फल्ले यांचा मोहनभाई पालेषा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया केसकर यांनी केले. आभार भगवान शिंदे यांनी मानले. सेक्रेटरी अनाउन्समेंट सुरेश दाभाडे यांनी केली. प्रकल्प प्रमुख दीपक फल्ले यांच्या नेतृत्वाखाली प्रशांत ताये, संतोष परदेशी, राकेश ओसवाल, प्रदीप मुंगसे, विनोद राठोड, राकेश गरुड, प्रदीप टेकवडे, निखिल माहापत्रा यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले.