पुणे जिल्हा | डॉ. सुदीप ओहोळ राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित पुरस्काराने सन्मानित

इंदापूर, (प्रतिनिधी)- आयुर्वेद पंचकर्म आणि निसर्गोपचार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व्यसनमुक युवक संघ, महाराष्ट्र राज्य संस्थापक, युवकमित्र हभप बंडातात्या कराडकर महाराज यांच्या हस्ते गलांडवाडी नं. 1 च्या पंचगव्य निसर्गोपचार केंद्राचे सर्वेसर्वा डॉ. सुदीप सुनिल ओहोळ यांना राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
व्यसनमुक्त युवक संघटनेचा रौप्यमहोत्सव व जगद् गुरू श्री तुकोबारायनिर्याण त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त दि. 8 ते 15 मे या कालावधीत श्री क्षेत्र देहू येथील गाथा मंदिर याठिकाणी युवकयुवतींसाठी 25 वा प्रतापी संस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी डॉ. ओहोळ यांना कराडकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
इंदापूर तालुक्यातील गलांवाडी गावात, मागील 21 वर्षांपूर्वी, आर्थिक परिस्थितीने मागसलेल्या आणि आईच्या व्याधीने व वडिलांच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंब होरपळून जात असताना, वयाच्या 14 व्या वर्षीच निःस्वार्थपने समाजाचे हित जोपासणार्या व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यासंस्थेचे डॉ. सुदीप ओहोळ सभासद झाले होते.
डॉ. ओहोळ, कला पदवीधर शिक्षण तसेच संगणकी शिक्षण प्राप्त करून सुद्धा आरोग्य क्षेत्रात भांडवलाशिवाय अभ्यास सुरु केला. सातत्याने राष्ट्रबंधू राजीव दीक्षित यांचे मार्गदर्शन लाभले. सतत भेट होत राहिल, त्यांच्या अनेक पुस्तकांचा, व्याख्यानांचा अभ्यास केला व पंचगव्य गुरुकुलम कांचीचिपुरम (तमिळनाडू) येथून अधिकृत पंचगव्य डिप्लोमा शिक्षण पूर्ण करून, पंचगव्य चिकित्सालाय सुरु केले. गलांडवाडी गावातच प्रत्येक शनिवारी व्यसनमुक्तीचे मोफत शिबीर सुरु केले. शेकडो युवकांना व्यसनमुक्त केले. अनेक वर्षे ते व्यसनमुक्त युवक संघनेचा तालुका अध्यक्ष होते.





