नगर (प्रतिनिधी) – डॉ. प्रकाश कांकरिया मारहाण प्रकरणातील संशियीत आरोपी माजी आमदार शिवाजी भानुदास कर्डिले, तसेच प्रकाश कुंडलिक कर्डिले, अनिल प्रकाश कर्डिले यांची सबळ पुराव्यांअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
डॉ. कांकरिया यांनी शिवाजी भानुदास कर्डिले, प्रकाश कुंडलिक कर्डिले, अनिल प्रकाश कर्डिले यांनी बुऱ्हाणनगर येथील त्यांच्या घरी बोलावून पिस्तूलाचा धाक दाखवत जमिनीचे मूळ कागदपत्र हिसाकवून घेत जिवे मारण्याची धमकी दिली होती, अशी फिर्याद भिंगार कॅंप पोलीस ठाण्यात दिली होती.
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयातील मुख्य न्यायधीश पी. एस. चांदगुडे यांच्या कोर्टासमोर झाली. यावेळी न्यायाधीशांनी सबळ पुरावा समोर न आल्याने संशयीत आरोपींची निर्दोष मुक्तात केली. आरोपींतर्फे ऍड. सुधीर बाफना, ऍड. विश्वासराव आठरे यांनी युक्तिवाद केला, तर सरकारतर्फे ऍड. प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली.