ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कॉंग्रेस हायकमांडचा दणका; SC विभागाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी
Updated On:

नवी दिल्ली – वादग्रस्त विधाने आणि निर्णयामुळे कायम चर्चेत राहणारे कॉंग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना कॉंग्रेस हायकमांडने धक्का दिला आहे. नितीन राऊत यांची कॉंग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांची निवड करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात वाद पेटला आहे. या अंतर्गत वादाचे पडसाद आता स्पष्टपणे दिसून येत आहे.





