Dr Neelam Gorhe – महाराष्ट्र विधान परिषद सदस्यपदी सलग पाचव्यांदा बिनविरोध निवडून आल्यानंतर शिवसेना नेत्या तथा आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी (दि. १७) पुण्यातील ग्रामदैवतांचे दर्शन घेत धार्मिक व सांस्कृतिक परंपरेला अभिवादन केले. श्री कसबा गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीदत्त मंदिर या सर्व ठिकाणी त्यांनी विधिवत पूजा व आरती करीत दर्शन घेतले. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्याची गरज असल्याचे सांगत डाॅ. गोऱ्हे म्हणाल्या, गोरगरिब आणि सामान्य कुटुंबांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहिला पाहिजे. शासनाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना अधिकाधिक योजनांचा लाभ मिळावा, त्यांचे जीवन सुलभ व्हावे यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रातील महायुती सरकारला भ्रष्टाचारमुक्त शासन करण्याची शक्ती मिळो. सामान्य लोकांच्या प्रश्नांमध्ये अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रभावी कायदा व्हावा, अशी अपेक्षा डाॅ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख प्रकाश ढमढेरे, शहर संघटक आनंद गोयल, समन्वयक राजाभाऊ भिलारे, वडगावशेरी विधानसभा प्रमुख हेमंत बत्ते, शहर सचिव संदीप शिंदे, झोपडपट्टी शहर प्रमुख राजू विटकर, महेंद्र जोशी, राहुल खैरे, सुधीर कुरुमकर, निलेश घारे, बारामती संपर्क प्रमुख कांताताई पांढरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिता परदेशी, भारती महेंद्र जोशी, अनिता शिंदे आदी उपस्थित होते.