Pune | डाॅ. बाबा आढाव यांनी उपोषण सोडले

पुणे, – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. या निकालानंतर अनेकांकडून “ईव्हीएम’बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाची भूमिका घेतली होती. अनेक राजकीय मंडळींनी बाबा आढाव यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर बाबा आढाव यांनी उपोषण सोडले.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून २८ नोव्हेंबरपासून पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे डॉ. बाबा आढाव हे आत्मक्लेश उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेमंडळींकडून घेण्यात आली. उद्धव ठाकरेंच्या हस्ते जलप्राशन करून आढाव यांनी उपोषण सोडले.
“मला असं वाटतंय, कीआम्ही करतोय ते बरोबर करतोय हे सांगणारं कोणीतरी वडिलधारी असावं लागतं. ते काम तुम्ही केलंय. पण आता तुम्ही आत्मक्लेश करू नका. हा आत्मक्लेश अख्ख्या महाराष्ट्राचा आहे,’ असे म्हणत ठाकरेंनी बाबा आढाव यांना उपोषण सोडण्याचा आग्रह धरला.





