डग्लस स्टुअर्ट यांच्या “शुगी बेन’ला बुकर पुरस्कार

लंडन – न्यूयॉर्कस्थित आणि मूळ स्कॉटलंडचे नागरिक असलेले लेखक डग्लस स्टुअर्ट यांच्या “शुगी बेन’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकला या वर्षीचे बुकर पारितोषिक जाहीर झाले आहे. स्टुअर्ट यांचे हे पहिलेच पुस्तक असून या पुस्तकात त्यांनी 1980 च्या काळात प्रेम आणि मद्याच्या आहारी जाण्याबाबतच्या अनुभवांचे कथन केले आहे. भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोषी यांच्या “बर्न्ट शुगर’ या पुस्तकाला मात्र यंदाच्या बुकर पारितोषिकाने हुलकावणी दिली.

स्टुअर्ट यांनी हा मानाचा पुरस्कार आपल्या आईला समर्पित केला आहे. स्टुअर्ट 16 वर्षांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे अतिमद्यसेवनामुळे निधन झाले होते. लंडनमधील रॉयल कॉलेज ऑफ आर्टमधून पदवी मिळवल्यानंतर स्टुअर्ट यांनी फॅशन डिझाईनमध्ये करिअर करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

आपल्या पुस्तकाला बुकर पारितोषिक मिळाल्यावर स्टुअर्ट यांना विश्‍वासच बसला नाही. “शुगी’ हे कल्पनारंजन आहे. मात्र हे पुस्तक लिहिणे आपल्यासाठी खूपच सुखदारी होते, असे स्टुअर्ट यांनी म्हटले आहे. आपल्याला नेहमीच लेखक बनण्याची इच्छा होती. त्यामुळे या पुस्तकाच्या अनुषंगाने ही इच्छा पूर्ण झाली. या पुस्तकामुळे आपले संपूर्ण आयुष्यच बदलून गेले असे त्यांनी पुरस्कार स्वीकारतानाच्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात सांगितले.

बुकर पुरस्कारासाठीच्या संभाव्य 6 लेखकांच्या यादीमध्ये दुबईस्थित भारतीय वंशाच्या लेखिका अवनी दोषी यांच्या “बर्न्ट शुगर’ या पुस्तकाचाही समावेश होता. मात्र, त्यांना पुरस्कार मिळू शकला नाही. त्यांच्याव्यतिरिक्‍त झिम्बाब्वेचे लेखक त्सिटी डांगारेम्बा आणि डियान कुक, मझा मेंगिस्टे आणि ब्रॅंडन टेलर या अमेरिकेच्या लेखकांचाही अंतिम संभाव्य 6 लेखकांमध्ये समावेश होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.