सिकंदर शेखच्या अटकेबाबत शंका? सुप्रिया सुळेंचा थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना फोन; दिले ‘हे’ आश्वासन

Sikandar Shaikh Arrested | महाराष्ट्र केसरी 2024ची गदा पटकालेला पैलवान सिकंदर शेख अडचणीत सापडला आहे. राजस्थानमधील कुख्यात पपला गुर्जर टोळीशी संबंध आणि अवैध शस्त्र तस्करी केल्याच्या आरोपावरून पंजाब पोलिसांनी सिकंदरला बेड्या ठोकल्या आहेत. परंतु सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाला अडकवले जात असल्याचा आरोप केला.
याप्रकरणावर आता शरद पवार गटाचे नेते रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनी देखील पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत संपर्क साधला असून या प्रकरणाची सखोल माहिती घेऊन सत्य समोर आणावे, अशी मागणी केली आहे.
याबाबत स्वत: सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. “महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या प्रकरणासंदर्भात माझे आणि आमदार रोहित पवार यांचे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासोबत बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन आज दुपारपर्यंत आम्हाला कळवण्याचे आश्वासन दिलं आहे,” असं खासदार सुळे यांनी सांगितलं. Sikandar Shaikh Arrested |
महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख यांच्या प्रकरणासंदर्भात माझे आणि आमदार रोहित पवार (@RRPSpeaks) यांचे पंजाबचे मुख्यमंत्री मा. भगवंत जी मान यांच्यासोबत बोलणे झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत सर्व माहिती घेऊन आज दुपारपर्यंत आम्हाला कळविण्याचे आश्वासन दिले आहे.
Regarding the…
— Supriya Sule (@supriya_sule) November 3, 2025
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
सिकंदर शेख याच्यावर झालेल्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत रोहित पवारांनी ट्वीट करत म्हंटले होते की, “सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत फक्त त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीत त्याची होत असलेली प्रगती पाहून कोणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न करू शकते.”
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर ते अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरू असून यातून सकारात्मक मार्ग निघेल,” असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला होता. Sikandar Shaikh Arrested |
पै. सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला… pic.twitter.com/piZjXqwCGB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 1, 2025
काय आहे नेमकं प्रकरण?
सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी सिकंदर शेख याचा हरियाणा आणि राजस्थानात कुख्यात असेलेल्या पपला गुर्जर टोळीशी त्याचा थेट संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. दानवीर आणि त्याचा साथीदार बंटी हे दोन संशयित 24 ऑक्टोबर रोजी एसयूव्ही गाडीतून दोन शस्त्रे घेऊन मोहालीत आले होते आणि ही शस्त्रे सिकंदर शेखकडे देण्याचे ठरले होते.
संबंधित शस्त्रे कृष्ण ऊर्फ हॅप्पीकडे पुरवण्याची जबाबदारी सिकंदरकडे देण्यात आली होती, असा आरोप आहे. याप्रकरणी सिकंदरसह एकूण 4 जणांना सीआयए पथकाने शस्त्र तस्करी प्रकरणात मोहाली येथून अटक करण्यात आली आहे. मात्र सिकंदरच्या या अटकेमुळे कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्या या अटकेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. Sikandar Shaikh Arrested |
हेही वाचा:




