पुणे जिल्हा | कुटुंबाच्या आधारासाठी दाम दुप्पट ठेव

नारायणगाव, (वार्ताहर) – अजिंक्यतारा पतसंस्थेचे संचालक स्व. सचिन सुर्वे यांच्या निधनामुळे कुटुंबाला आधार मिळावा यासाठी अजिंक्यतारा पतसंस्थेने 2 लाख 51 हजार रुपयाची दाम दुप्पट ठेवीची पावती पतसंस्थेत करण्यात आली असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे यांनी दिली.
अजिंक्यतारा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नारायणगाव (ता. जुन्नर) येथील मुक्ताई मंगल कार्यालयात पार पडली त्यावेळी बोलत होते.
यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित बेनके, ग्रामोन्नत्ती मंडळाचे अध्यक्ष सुजित खैरे, उपाध्यक्ष शशिकांत वाजगे, धर्मवीर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण डेरे,
विक्रांत पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, शिवस्मृती पतसंस्थेचे संचालक अनिल दिवटे, अर्थसंपदाचे अध्यक्ष रमेश मेहेत्रे, सुदीप कसाबे, पंडित लोणकर, जुबेर शेख, किरण तांबे, सोपान खैरे, रामदास अभंग, रोहिदास केदारी, संचालक विकास फुलसुंदर, राजेश कोल्हे,
राहुल पापळ, विशाल तिवारी, राहुल आडसरे, सचिन सरोदे, अंजली वाजगे, वर्षा कोकणे, अॅड. मुलाणी, रमेश चोरडिया, भावेश डोंगरे, सागर भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर कोरडे, राजेंद्र विटे, सुरेखा शिंदे, परविन शेख,
विजय भुसारी उपस्थित होते. युवा नेते अमित बेनके यांनी संस्थेने केलेल्या प्रगतीचा आढावा पाहून कौतुक केले. वार्षिक सर्वसाधारण सभेचे नियोजन करताना महिलांची लक्षणीय उपस्थिती असल्याने समाधान व्यक्त केले.
यावेळी सामाजिक उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 व 2 मधील विद्यार्थ्यांना स्मृती शिष्यवृत्ती ठेव योजनेअंतर्गत गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.राज्य सहकारी संघाचे जिल्हा विकास अधिकारी ए. डी.केदारी यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. अहवाल वाचन अतुल आहेर, सूत्रसंचालन एच. पी. नरसुडे तर सरिता मावळे यांनी आभार मानले.
आर्थिक परिस्थिती
संस्थेचा एकूण व्यवसाय 39कोटी.
खेळते भाग भांडवल 24 कोटी
ठेवी 20 कोटी 57 लाख
कर्ज 18 कोटी 21 लाख
नफा 25 लाख 44 हजार
ऑडिट वर्ग अ





