गुंतवणुकीसाठी राहा तयार! ‘ही’ कंपनी आणणार 5000 कोटींचा IPO, सेबीकडे ड्राफ्ट जमा

Upcoming IPO: भारतीय शेअर बाजारात सुचीबद्ध होण्यासाठी अनेक कंपन्यांकडून प्रयत्न केले जात आहेत. कंपन्या कोट्यावधी रुपयांचा आयपीओ घेऊन येत आहेत. आता रसायनांची निर्मिती करणारी कंपनी Dorf-Ketel Chemicals India आयपीओच्या माध्यमातून तब्बल 5 हजार कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने सेबीकडे ड्राफ्ट जमा केला आहे.
या आयपीओ अंतर्गत कंपनीकडून 1500 कोटी रुपयांचे नवीन इक्विटी शेअर जारी करणार आहे. सोबतच, प्रमोटर मेनन फॅमिली होल्डिंग्स ट्रस्टकडे 3500 कोटी रुपयांच्या शेअर्सचे ओएफएस (Offer for Sale) असेल. कंपनी प्री-आयपीओ राउंडमध्ये 300 कोटी उभारण्याचा विचार करत आहे.
कंपनीने प्री आयपीओ राउंडमध्ये पैसे उभारल्यास नवीन शेअर्सची संख्या कमी होईल. कंपनीद्वारे आयपीओद्वारे उभारण्यात येणाऱ्या पैशांचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी केला जाणार आहे. यातील 1,162 कोटी रुपयांचा वापर कंपनी स्वतःच्या व सहाय्यक कंपनी डॉर्फ केटल केमिकल्स FZE वरील कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. तर इतर पैसा कॉर्पोरेट कामासाठी वापरण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
कंपनीच्या कामाबद्दल सांगायचे तर Dorf-Ketel Chemicals India ही हाइड्रोकार्बनसाठी स्पेशिएलिटी केमिकल्स आणि इंडस्ट्रियल स्पेशिएलिटी केमिकल्सची निर्मिती करते. कंपनीची स्थापना 1992 ला झाली. कंपनीचे 4 देशांमध्ये 16 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत.
डॉर्फ-केटेल केमिकल्स इंडियाद्वारे कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज, पेट्रोनास, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, पीपीजी इंडस्ट्रीज, क्लॅरियंट, लिबर्टी एनर्जी, इटॅलियाना पेट्रोली आणि वेदांता सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांना विशेष रसायन उत्पादनांचा पुरवठा केला जातो.
आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीच्या नफ्यात 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीचा नफा 602 कोटी रुपये होता. तर महसूल 41.7 टक्क्यांनी वाढून 5,479.5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. आता कंपनी आयपीओच्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. सेबीकडून कंपनीच्या ड्राफ्टला मंजूरी मिळाल्याने आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला होईल.
(नोंद – लेखामधील माहिती हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागाराशी चर्चा करावी.)




