आमच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे आम्ही दबले जाऊ असं समजू नका – अनिल बोंडे
Updated On:
अमरावती – पंचवटी चौकात आंदोलन करणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षार्थ्यांना प्रोत्साहित केल्याप्रकरणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांच्यासह भाजपच्या पाच नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई राजकीय हेतून केली असल्याचा आरोप लावत याचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला आहे.
सरकारने आमच्यावर गुन्हे दाखल केले म्हणजे आम्ही दबले जाऊ, थांबुन घेऊ असं समजू नका. जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा आम्ही तिथे सर्व ताकदीने उभे राहू , असा इशारा अमरावती येथील पत्रकार परिषदेत माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी सरकारला दिला.
टॅग्स:

