बीड – मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचाविरोध नाही, मात्र ते आरक्षण ओबीसींमधून देऊ नका, वेगळेआरक्षण द्या, चुकीचे आरक्षण देऊ नका,चुकीचे पायंडे पाडू नका. आरक्षणासाठी नवेआयोग स्थापन केले जात आहेत. देशाच्या मुख्य न्यायमूर्तींना २ लाख८० हजार पगार आहे, तर आयोगाच्याअध्यक्षांना ४ लाख ८० हजार रुपये पगारदिला जात आहे.
हा जनतेचा पैसा आहे.ओबीसी आरक्षणाविरोधातील याचिकेलासरकारकडून चांगला वकीलही मिळतनाही, असा सरकारला घरचा आहेर छगन भुजबळ यांनी बीडच्या सभेतून दिला.
दरम्यान, भुजबळ यांनी मुख्यमंत्री होऊन गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पूर्ण करावे, असे म्हणत माजी मंत्री महादेव जानकर यांनी भरसभेत छगन भुजबळ यांचे पाय धरले.
बीडमध्ये जिल्हा क्रीडा संकुलावरझालेल्या एल्गार सभेस प्रकाश शेंडगे, आ.गोपीचंद पडळकर, महादेव जानकर, टी.पी. मुंडे, नारायणराव मुंडे आदींची उपस्थिती होती. भुजबळ पुढे म्हणाले, आज गोपीनाथ मुंडे असते तर हे सारे प्रश्न निर्माण झालेच नसते. बीडमध्ये विचारपूर्वक प्लॅन करून जाळपोळ, हिंसाचार झाला.
समोरच्या लोकांना अनेक जण बोलावून मदत देताहेत, आमच्याविरोधात शक्ती देणारांना आम्ही जागा दाखवून देऊ. जरांगे यांचे नाव न घेता भुजबळ म्हणले, विरोधात काहीही बोलायचे, गलिच्छ बोलायचे ही मस्ती कुठून आली?
मुंडे, क्षीरसागरांनी फिरवली पाठ
बीडच्या या मेळाव्याकडे अोबीसी नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठ फिरवली. यावर बाेलताना भुजबळ म्हणाले, बीडमध्ये मोठमोठे नेते आहेत, पण आज एल्गार सभेसाठी आम्ही छोटे-छोटे लोक आहोत. अनेक जण बहाणे सांगताहेत.