बेल्हे -येथील एकास मागील आठवड्यात करोनाची लागण झाली होती. त्याच्या संपर्कातील घरातील चौघे तर अन्य एका एक अशा एकूण पाच जणांचा अहवाल बुधवारी (दि. 5) पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान, एकाच घरीतील पाच जण तर गावातील बाधित एका बटाटा व्यावसायिकाच्या संपर्कातील एक जण पॉझिटिव्हा आढळल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता शासनाने दिलेलेया नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. थोरात यांनी दिली.
तर बेल्हे गावातील एकूण रुग्ण संख्या 20 झाली असून उपचारा दरम्यान 8 रुग्ण बरे झालेले आहेत तर 11 रुग्ण ऍक्टिव्ह असून एकाचा मृत्यू झाला आहे.