Mamata Banerjee | कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या संजय रॉयला फाशीची शिक्षा न दिल्यामुळे पश्चिम बंगाल सरकारने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरोधात राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील केले आहे.
ममता सरकारने दोषीला फाशीची शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. आरोपीला जन्मठेपेची शिक्षा जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली होती. सोमवारी कोलकाता न्यायालयाने संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. Mamata Banerjee |
ममता बॅनर्जी काय म्हणाल्या?
यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, “तुम्ही त्याला जन्मठेपेची शिक्षा देत आहात? तो पॅरोल घेऊन बाहेर येऊ शकतो. मी शिक्षेशी सहमत नाही. आम्ही सर्वांनी फाशीची मागणी केली होती, पण न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण आमच्याकडून जबरदस्तीने काढून घेण्यात आले होते. ते कोलकाता पोलिसांकडे असते, तर त्याला फाशीची शिक्षा मिळेल याची आम्ही खात्री केली असती.” Mamata Banerjee |
संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा आणि दंडही ठोठावला
यापूर्वी सोमवारी आरजी कार प्रकरणात शिक्षा जाहीर करण्यात आली होती. दुपारी २.४५ वाजता निकाल देताना न्यायालयाने दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सियालदाह न्यायालयाने संजय रॉय याला ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. सियालदाह न्यायालयाचे न्या. अनिर्बान दास म्हणाले की, हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला नाही. पीडितेच्या कुटुंबाला त्याच्या मृत्यूबद्दल १० लाख रुपये भरपाई आणि अतिरिक्त ७ लाख रुपये द्यावेत.
काय प्रकरण आहे?
सियालदाह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांनी शनिवारी संजय रॉय याला गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले. या गुन्ह्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आणि बराच काळ निदर्शने सुरू राहिली होती.
न्यायाधीशांनी संजयला भारतीय दंड संहितेच्या कलम 64, 66 आणि 103 (1) अंतर्गत दोषी ठरवले होते. त्यामध्ये किमान जन्मठेपेची शिक्षा आहे, तर जास्तीत जास्त शिक्षा मृत्युदंड असू शकते. Mamata Banerjee |
हेही वाचा: