सांगली (प्रतिनिधी) -मिरजेतील दत्त कॉलनी आणि शिराळा तालुक्यातील मणदूर येथील दोघांना करोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे. मिरज येथे मिरज-मालगाव रस्त्यावरील दत्त कॉलनीतील 67 वर्षांच्या वृद्धासह चार जण रुग्णवाहिकेतून मुंबईतून मिरजेत आले होते. 67 वर्षांच्या वृद्धामध्ये करोनाची लक्षणे आढळल्याने त्याला मिरज येथील करोना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. त्याच्या करोना चाचणीचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. मणदूर, ता. शिराळा येथील 81 वर्षांच्या वृद्धाच्या करोना चाचणीचा अहवालदेखील पॉझिटिव्ह आला आहे.